भारतीय जनता पक्षाने महिलांच्या सक्षमीकरण, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण योजना राबविल्या आहेत. या योजनांचा उद्देश विविध समाजघटकांना आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक फायदे मिळवून देणे आहे. खाली दिलेल्या योजनांद्वारे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी ठोस पाऊल उचलले आहे, जे राज्यातील सर्व नागरिकांना न्याय आणि विकासाचा मार्ग दाखवत आहेत.
भारतीय जनता पार्टी योजना
आपली एकता, आपली ताकद – विकासाची सगळी वाटचाल याचमुळे शक्य!

माझी लाडकी बहीण योजना
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार आहे.
कृषी तारण कर्ज योजना
या योजनेमध्ये शेतकरी म्हणून तुम्ही तुमचे उत्पादन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात ठेवू शकता आणि त्या उत्पादनाच्या किंमतीच्या ७५% रक्कम कर्ज म्हणून मिळवू शकता. बाजारात उत्पादनांचे दर वधारले की तुम्ही तुमचे उत्पादन बाजारात विकू शकता आणि कर्जाची परतफेड करू शकता. तुमच्या उत्पादनाला जास्त चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने ही योजना एक वरदानच आहे.
सुकन्या समृद्धि योजना
सुकन्या समृद्धी खाते हे भारत सरकारचे आणखी एक स्वागतार्ह पाऊल आहे. भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांनी 22 जानेवारी 2015 रोजी सुकन्या समृद्धी खाते “एक छोटी बचत योजना” लाँच केली. हा भारत सरकारच्या (GOI) “बेटी बचाओ बेटी पढाओ” उपक्रमाचा भाग आहे, ज्याला BBB म्हणूनही ओळखले जाते. भारत सरकारच्या प्रामाणिक प्रयत्नांनंतरही, भारतातील लिंग गुणोत्तर हा अजूनही एक गंभीर चिंतेचा विषय आहे आणि हे देशाचे मागासलेपण दर्शवते. मुलींबद्दलची लोकांची मानसिकता बदलण्यासाठी भारत सरकार पावले उचलत आहे हे कौतुकास्पद आहे. भारताला महिलांसाठी एक सुरक्षित ठिकाण बनवायचे असेल तर आपल्याला लैंगिक असमतोल दूर करावे लागेल. अत्यंत सोप्या पद्धतीने दिलेला खोल सामाजिक संदेश.
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना
पीएम-किसान योजना या नावाने ही योजना प्रसिद्ध आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीचा आकार विचारात न घेता, स्वत:च्या नावावर लागवडीयोग्य जमीन असलेल्या सर्व शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६००० रूपये इतकी रक्कम प्रदान केली जाते. हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.
ST प्रवासात महिलांना 50% सूट
सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50 टक्के सूट, आता यामध्ये साधी, मिनी बस, निमआराम म्हणजेच एशियाड गाडी, विनावातानुकुलित शयन-आसनी म्हणजे नॉन एसी स्लिपर कोच एसटी बस, आणि शिवशाही, शिवनेरी, शिवाई या तिन्ही साध्या आणि एसी बसमध्ये 50 टक्के सवलत 17 मार्चपासून लागू करण्यात आली आहे…
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भविष्यात एसटी महामंडळात नव्याने दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेसकरताही ही सवलत लागू असणार. महिलांसाठी सवलत असलेल्या तिकीटाची रंगसंगती वेगळी असणार आहे.
कृषी योजना
शेतकरी वर्गासाठी राज्य शासनातर्फे अनेक योजना उपलब्ध आहेत. माती, बियाणे, सिंचन, यंत्रे, तंत्रज्ञान, पत, विमा, पिकाला संरक्षण आणि विपणन हे शेतीशी संबंधित महत्वपूर्ण घटक आहेत. तुम्हाला याबाबत सहाय्य हवे असल्यास राज्य सरकारने देऊ केलेल्या विविध योजनांबाबत जाणून घ्या.